

Dilip Khedkar
ESakal
नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर): वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी दिलीप खेडकर यांना बेलापूर न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करणे, यांसारखे गंभीर आरोप असलेल्या खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी (ता. ८) फेटाळण्यात आला. न्यायालयाने सखोल तपासाचे आदेश दिले आहेत.