
मुंबई : मुंबईत दरवर्षी प्रमाणे यंदाही वांद्रे येथे माउंट मेरी जत्रा साजरी करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात माउंट मेरी चर्चमध्ये हा उत्सव साजरा केला जात असून हा उत्सव व्हर्जिन मेरीच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केले जाते. या उत्सवात जगभरातील हजारो यात्रेकरू तसेच पर्यटक सहभागी होतात. या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या पाहता बेस्टने अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.