BEST News: सायन पूल आजपासून बंद; बेस्टचे 23 मार्ग बदलले, नागरिकांचे हाल

सायन उड्डाणपूल आज बंद केल्यामुळे येथील बेस्टचे 13 बसमार्ग बंद केले आहेत. हा पूल शनिवारी पाडण्यात येणार आहे.
sion bridge close
sion bridge closesakal

मुंबई - सायन उड्डाणपूल आज बंद केल्यामुळे येथील बेस्टचे 13 बसमार्ग बंद केले आहेत. हा पूल शनिवारी पाडण्यात येणार आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होणार आहे.

सायन उड्डाणपूल पूर्व - पश्चिम जोडणारा आहे. हा पूल मध्य रेल्वे तोडून नवीन बांधणार आहे. माटुंगा वाहतूक विभागातून बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून एल. बी. एस रोड तसेच संत रोहिदास रोडकडे जाणारी वाहतूक त्याचप्रमाणे कुर्ला वाहतूक विभागातून एल.बी.एस. रोड तसेच संत रोहिदास रोडवरून या पूलावरून आंबेडकरमार्गे जाणारी वाहतूक ही आजपासून पुढील १८ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्यामुळे स्थानिक नागरिकांचे हाल होणार आहे.

या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवून खालील प्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने देखील आपल्या बस मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

असा आहे बस मार्गांत बदल

  • ११ मर्यादित हि बस कला नगर मार्गे टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल मार्गे नेव्ही नगर येथे जाईल .

  • १८१ , २५५ म .३४८ म . ३५५ म या बस कला नगर मार्गे टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल सायन सर्कल मार्गे जातील.

  • बस क्र ए ३७६ हि सायन सर्कल हुन सायन हॉस्पिटल सुलोचना शेट्टी मार्गाने बावरी कॅम्प मार्गे माहीम येथे जाईल.

  • सी ३०५ हि बस धारावी आगार हुन पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल हुन बॅकबे आगार येथे जाईल .

  • बस क्र ३५६ म , ए ३७५ , व सी ५०५ या बस कला नगर बी के सी हुन प्रियदर्शनी येथे जातील.

  • बस क्र ७ म , २२ म , २५ म व ४११ या बस महाराष्ट्र काटा , धारावी आगार हुन पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल मार्गे जातील.

  • बस क्र ३१२ व ए ३४१ या बस महाराष्ट्र काटा , धारावी आगार हुन पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल, सायन सर्कल मार्गे जातील.

  • बस क्र ए सी ७२ भायंदर स्थानक ते काळाकिल्ला आगार व सी ३०२ हि बस मुलुंड बस स्थानक ते काळाकिल्ला आगार येथे खंडित करण्यात येईल.

  • बस क्र १७६ व ४६३ या बस काळाकिल्ला आगार येथून सुटतील व सायन स्थानक ९० फूट मार्गाने लेबर कॅम्प मार्गाने दादर माटुंगा स्थानकाकडे जातील.

  • बस क्र ए सी १० जलद , ए २५ व ३५२ या बसगाड्या राणी लक्ष्मीबाई चौक येथे खंडित करण्यात येथील व तेथूनच सुटतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com