Mumbai News: आर्थिक गर्तेत सापडलेल्या 'बेस्ट'ला पीपीपीचा आधार, तोटा भरून काढण्यासाठी प्रशासनाची नवी उपाययोजना

BEST Bus: बेस्ट प्रशासनाने उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी नवी उपाययोजना सुरू केली आहे. बेस्टने बस डेपो आणि बस स्थानके 'सार्वजनिक-खासगी भागीदारी' तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
BEST Bus Administration

BEST Bus Administration

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेली 'बेस्ट' वाहतूक सेवा सध्या प्रचंड आर्थिक तोट्यातून जात आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आता आपले बस डेपो आणि बस स्थानके 'सार्वजनिक-खासगी भागीदारी' तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील एकूण २७डेपोंपैकी उरलेल्या २२ बस डेपोंचा कायापालट करून त्यातून कोट्यवधी रुपयांचा महसूल उभारण्याची तयारी सुरू आहे. याबाबतचे एक विशेष सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com