

BEST Bus Service
ESakal
मुंबई : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी (नीट) बसलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सोयीचा आणि सुरक्षित व्हावा, यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबईत विशेष बसेसचे नियोजन केले आहे. मुंबईतील विविध परीक्षा केंद्रांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २४ प्रमुख बस मार्गांवर एकूण ६० जादा बसेस चालविण्यात येणार असून, या बसेसच्या माध्यमातून दिवसभरात सुमारे १८० फेऱ्या पूर्ण केल्या जाणार आहेत.