मुंबईहून गावाकडे गेले आणि शेवटी नको ते झालेच.. 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून अनेक जणांचे कुटुंब मुंबई सोडून गावी जात आहे. मुंबईपेक्षा गावाकडच्या घरी सुरक्षित राहील या विचाराने अनेकांनी मुंबईला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून अनेक जणांचे कुटुंब मुंबई सोडून गावी जात आहे. मुंबईपेक्षा गावाकडच्या घरी सुरक्षित राहील या विचाराने अनेकांनी मुंबईला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत नोकरी करणे सध्या धोकादायक ठरत असल्याने एक बेस्ट कर्मचारी खासगी वाहनाने साताऱ्याला आले. गावी आरोग्य तपासणी होऊन त्यांना क्वारंटाईन केले. दरम्यान त्याला खोकला, ताप, थकवा असा त्रास होऊ लागला. त्यांची कोरोना चाचणी केली अन् त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. ते पॉझिटिव्ह निघाले. उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल होऊन  चार दिवस होत नाही, तोच त्यांची पत्नी आणि मुलगी यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्या सर्वांवर सध्या सातारच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मोठी बातमी ः स्थलांतरीत कामगारच नव्हे दुकानदारही मुंबईबाहेर चालले; वाचा बातमी सविस्तर

विठ्ठल साळुंखे (नाव बदलले आहे) हे मुंबईत बेस्ट वाहन चालक म्हणून काम करतात. गेले दोन महिने ते नियमितपणे कर्तव्य बजावत होते. दिवसेदिवसे बेस्ट कर्माचाऱ्यांभोवती कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. बेस्ट आगार, अन्य ठिकाणी बेस्ट कर्मचाऱ्यासाठी कोरोनापासून बचावासाठी सुविधा दिल्या गेल्या नाहीत. मास्क शिवाय बेस्ट वाहनचालक व वाहक यांच्याकडे दुसरे कोणतीही सुरक्षेची साधने नाही, असे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे. विठ्ठल साळुंखे हे आपल्या कुटूंबाला घेऊन गेल्या आठवड्यात खाजगी वाहनाने साताराऱ्याला गावी आले. कुटूंबाच्या सुरक्षित गावी ठेवून ते पुन्हा मुंबईला जाऊन कामावर रूजू होणार होते. परंतु गावी पोहोचल्यावर त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांना घरी जाण्यापूर्वी क्वारंटाईन करण्यात आले. क्वारंटाईनमध्ये राहत असताना त्यांची प्रकृती बिघडू लागली. खोकला, ताप, दम लागू लागला. सुरूवातील उपचार केले; परंतु गुण येत नव्हता. त्यानंतर डॉक्टरांनी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली, असे विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले. 

मोठी बातमी ः कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी ‘येस टू लाईफ...नो टू टोबॅको’ ऑनलाईन मैफल 

विठ्ठल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात येताच त्यांच्या कुटूंबियांनाही साताऱ्यातील खटाव तालुक्यातील एका गावात क्वारंटाईन केले. परंतु त्या जागेची अवस्था खूप वाईट होती. पंखे बंद, झोपण्यासाठी नीट अंथरुण नव्हते, पिण्यासाठी योग्य पाणी नाही, सॅनिटायझर नाही,  अशा परिस्थितीत माझे कुटूंब राहत होते. 25 मे पासून साताराच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु गावच्या ठिकाणी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णकडे निटसे लक्ष दिले जात नाही. मला जेथे उपचारासाठी ठेवले ती जागा रुग्णालयाच्या मागच्या बाजूला छोटीशी आहे. काही हवे असल्यास प्रतिसादासाठी खूप वाट पाहावी लागते. तसेच रुग्णालयातील कर्मचारी आमच्या येथे दिवसातून एखाद दुसरेवेळा फिरकतात. 

मोठी बातमी ः विद्या बालनने पेलली दुहेरी जबाबदारी; एक अभिनेत्री म्हणून तर दुसरी..?

रुग्णासाठी येणारे जेवण अतिशय वाईट आहे, पण खाण्याशिवाय पर्याय नाही, असे विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले. मला रुग्णालयात दाखल होऊन चार दिवस झाले तेच काल समजले की, मुलगी आणि पत्नीची ही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. कोरोनाच्या भीतीने कुटूंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी गावी आलो. पण शेवटी नको हवे होते तेच झाले. गावच्या ठिकाणी क्वारंटाईन झालेल्यांची काळजी प्रशासन व्यवस्थित घेत नाही. क्वारंटाईन ठिकाणी स्वच्छता व सॅनिटायझर नाही, असे विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: best employee come back to home anf get corona positve