विद्या बालनने पेलली दुहेरी जबाबदारी; एक अभिनेत्री म्हणून तर दुसरी..?

विद्या बालनने पेलली दुहेरी जबाबदारी; एक अभिनेत्री म्हणून तर दुसरी..?

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत काही नायिका अशा आहेत की त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व सिद्ध केले आहे. त्यांचे चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये सामील झालेले आहेत आणि तेही त्यांनी स्वतःच्या हिमतीवर केलेले आहेत. कंगना रानौत, विद्या बालन, तापसी पन्नू अशी काही नायिकांची नावे त्याबाबतीत घेता येतील. नायकाप्रमाणेच त्यांनी 'हम भी कुछ कम नही' हे सिद्ध केले आहे. कठोर मेहनत आणि चांगली स्क्रीप्टच्या जोरावर हे शक्य झाले आहे. विद्या बालन ही गुणी आणि अभिनयसंप्पन नायिका. आतापर्यंत तिने विविध भूमिका साकारल्या आहेत आणि प्रत्येक भूमिकेत तिने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. छोट्या पडद्यावरून वाटचाल केलेल्या या अभिनेत्रींचा मोठ्या पडद्यावरचा प्रवासही यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे महिलाप्रधान चित्रपटांमध्ये तिने अधिक काम केले आहे आणि प्रत्येक चित्रपटात आपल्या अभिनयाचे विविध पैलू दाखविले आहेत. अत्यंत गुणी आणि सालस अशी ही अभिनेत्री. स्वतःच्या हिमतीवर यशस्वी वाटचाल ती करीत आहे खरी. पण आता विद्या एक नवीन इनिंग खेळण्यास सज्ज झाली आहे.

तिने एका लघुपटाची निर्मिती केली आहे. 'नटखट' असे त्या लघुपटाचे नाव आहे. या लघुपटात ती काम करीत आहे आणि त्याचबरोबर निर्मितीही तिची आहे. सुरेखा नावाची भूमिका ती साकारत आहे. सुरेखा ही एका मुलाची आई आहे.  सोशल मीडियावर या लघुपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे आणि पोस्टरवर विद्या आणि एक मुलगा आहे. त्यामुळे ही आई व मुलाची कथा असणार आहे. रोनी स्क्रूवाला यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. विशेष बाब म्हणजे या लघुपटाचा ग्लोबल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे. या फेस्टिव्हल 2 जून रोजी यू ट्यूब चॅनेलवरून प्रसारित होणार आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com