अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

Mumbai BEST Service: मुंबईतील लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बेस्ट कर्मचारी संघर्ष समितीने पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. आंदोलनामुळे बेस्ट बससेवेवर मोठा परिणाम झाला होता.
Mumbai BEST Service

Mumbai BEST Service

ESakal

Updated on

मुंबईकरांना गेल्या तीन दिवसांपासून वेठीस धरणारा बेस्ट कर्मचारी संघर्ष समितीचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर आणि सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याने संघर्ष समितीने आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे बेस्ट बससेवेवर मोठा परिणाम झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com