
Public Transport: आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमाने नवीन वर्षात तिकीटदरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या या निर्णयामुळे ३२ लाखांहून अधिक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. बेस्ट उपक्रमाचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प पालिकेतील प्रशासकीय स्थायी समिती तथा पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांना गुरुवारी सादर करण्यात आला. २०१९ ते आतापर्यंत बेस्टला नऊ हजार २८६ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे, असे बेस्टकडून सांगण्यात आले.