

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा, या प्रमुख मागणीसाठी आणि खासगीकरणाला विरोध करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने बेमुदत संप पुकारला असून दुसऱ्या दिवशीही संप सुरू असल्यानं बेस्टची सेवा ठप्प आहे. यामुळे मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी दगडफेकीच्या आणि तोडफोडीच्या घटना घडल्यानं गाड्यांचं नुकसान झालं आहे. तर प्रशासनासोबत बैठकही निष्फळ ठरल्यानं संप सुरूच ठेवण्यावर कर्मचारी संघटना ठाम आहे. संपामुळे मेट्रोसह लोकलमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. तर खासगी वाहनचालकांकडून मनमानी सुरू आहे. Mumbai Bus Services Hit as BEST Strike Enters Day Two