धक्कादायक बातमी! बेस्टचे तब्बल 'इतके' गैरहजर कामगार बडतर्फ; कारवाई राहणार सुरूच..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

बेस्ट कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश देऊनही गैरहजर राहणाऱ्या आणखी १२ जणांना बेस्टने बडतर्फ केले. त्यामुळे बडतर्फ केलेल्या कामगारांची संख्या ३० झाली आहे. बडतर्फीची कारवाई सुरूच आहे. 

मुंबई : बेस्ट कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश देऊनही गैरहजर राहणाऱ्या आणखी १२ जणांना बेस्टने बडतर्फ केले. त्यामुळे बडतर्फ केलेल्या कामगारांची संख्या ३० झाली आहे. बडतर्फीची कारवाई सुरूच आहे. 

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी बेस्टने वाहतूक सेवा सुरु केली. दररोज बेस्टचे अनेक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत होते. आजही सर्वसामान्यांसाठी बेस्ट कर्मचारी सेवा देत आहेत. मात्र, काही कर्मचारी कामावर हजर राहण्याचे आदेश मिळूनही गैरहजर राहत आहेत. अशा एकूण ३० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत बेस्ट उपक्रमाने बडतर्फ केल्याची माहिती बेस्टने दिली. 

हेही वाचा: बापरे! कोरोनाच्या औषधाबाबत मुंबईत घडला धक्कादायक प्रकार; तब्बल ५ दिवस..

गेल्या आठवड्यापासून बडतर्फीची कारवाई सुरू असून, सोमवारी आणखी १२ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये चालक, वाहक, वाहतूक निरीक्षक आणि अन्य कर्मचारी आहेत. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देण्याऐवजी अनेक कर्मचारी गैरहजर राहिले. 

परिवहन सेवेबरोबरच विद्युत, अभियंता, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अशा कर्मचाऱ्यांना चार्जशीट देऊन कामावर रुजू होण्याचे आदेश दिले गेले. परंतु अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशा कामगारांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. २२ जूनपासून सुरू झालेल्या कारवाईत पहिल्यांदा ११ जणांना बडतर्फ करण्यात आले. 

हेही वाचा: काय सांगता! सोमवारी 'या' प्रकरणी मुंबईत एकही गुन्हा दाखल नाही; वाचा सविस्तर बातमी..

यामध्ये बॅकबे, धारावी, देवनार, दिंडोशी आगारातील चालक-वाहकांचा समावेश होता. चार दिवसानंतर आणखी सात जणांवर कारवाई केली. मात्र २९ जूनला तब्बल १२ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. आणखी काही जणांवर कारवाई होणार असल्याचे बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
BEST takn action on absent employees 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BEST takn action on absent employees