
मुंबई : बेस्ट उपक्रमातून १ ऑगस्ट २०२२ नंतर सेवानिवृत्त झालेल्या साडेचारहून अधिक कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी व इतर देणी तातडीने देण्यात यावी, या मागणीसाठी बेस्ट वर्कर्स युनियनच्या वतीने उद्या (ता. ६) दुपारी आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाने सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना त्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम तत्काळ द्यावी आणि जे कर्मचारी भविष्यात बेस्टच्या सेवेतून निवृत्त होणार आहेत त्यांना सेवानिवृत्तीची देय असलेली रक्कम तातडीने मिळावी तसेच त्याचे नियोजन बेस्ट प्रशासनाने करावे, यासाठी हा मोर्चा असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी म्हटले आहे.