esakal | एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.उज्ज्वला चक्रदेव यांची नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Ujwala Chakradeo

एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.उज्ज्वला चक्रदेव यांची नियुक्ती

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : नागपूर (nagpur) येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ उज्ज्वला श‍िरीष चक्रदेव (Dr. ujwala Chakradeo) यांची श्रीमती नाथ‍िबाई दामोदर ठाकरसी (SNDT) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी (vice chancellor) नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांनी आज डॉ उज्ज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली.

हेही वाचा: सामान्य स्त्रीयांसाठीही कणव दाखवा; चाकणच्या ताईंना भाजपचा टोला

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचा कार्यकाळ २ जूलै २०२१ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांचेकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. डॉ उज्ज्वला चक्रदेव (जन्म २७.०८.१९६२ ) यांनी राष्टसंत तुकडोजी महाराज नागपुर विदयापीठाच्या व्हीआरसीई येथुन वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम. टेक. तसेच वास्तुविदयाशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली.

डॉ उज्वला चक्रदेव यांनी मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी. पर्यवेक्षक म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर ३६ वर्षांचा अनुभव लाभला आहे.कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी छत्तिसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती न्या. यतिंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. पुणे येथील आयआयआयटीचे महासंचालक डॉ. अनुपम शुक्ला व राज्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ उज्वला चक्रदेव यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली.

loading image
go to top