esakal | भाईंदर : विकसकांकडून कर चुकवेगिरी'
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भाईंदर : विकसकांकडून कर चुकवेगिरी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : मिरा-भाईंदर (Mira Bhayander) शहरातील अनेक विकासकांनी त्यांना महापालिकेकडे (Municipal) भरायच्या मोकळ्या जागेवरील कराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी ठेवली आहे; परंतु या कराची थकबाकी नेमकी किती आहे याची अद्ययावत माहिती महापालिकेच्या नगररचना विभागाकडे उपलब्ध नाही.

विकासक महापालिकेकडे कराचा भरणा करत नसल्यामुळे ही थकबाकी विकासकांच्या नावावर असलेल्या इतर मालमत्तांच्या मालमत्ता करामध्ये समाविष्ट करून ती वसूल करावी, अशी मागणी सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी केली आहे.

अनेक विकासकांनी पालिकेकडे मोकळ्या जागेवरील कराचा भरणा केलेला नाही. या थकबाकीवरील व्याजाचीच रक्कम सुमारे ३५ कोटी होत आहे. तसेच न्यायालयीन | स्थगिती, तसेच अन्य कारणांमुळे इमारतींचे बांधकाम सुरू नसलेल्या विकासकांकडून सुमारे २५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र याव्यतिरिक्त विकासकांकडे कोट्यवधी रुपयांची करावी थकबाकी आहे. त्याची अद्ययावत माहिती पालिकेच्या नगररचना विभागाकडे उपलब्ध नाही. त्याची छाननी करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा: Drugs case: 'आर्यनला उद्ध्वस्त करू नका, त्याची मदत करा' म्हणणारी अभिनेत्री ट्रोल

त्यामुळे अशा विकासकांच्या शहरात असलेल्या इतर मालमत्तांना पालिकेकडून आकारण्यात आलेल्या मालमत्ता करामध्ये या थकबाकीची रक्कम समाविष्ट करण्यात यावी. यासाठी अशा थकवाकीदारांची संपूर्ण माहिती पालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे सुपूर्द करवी, जेणेकरून थकबाकीची वसुली करता येईल, अशी मागणी दळवी यांनी केली आहे.

loading image
go to top