

Bhayandar Car Airbag Blast
ESakal
मुंबई : कारमध्ये असणारी एअरबॅग कारचालकासह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी देण्यात येते. मात्र याच एअरबॅगमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरा-भाईंदरच्या प्लेजंट पार्क परिसरात एअरबॅग प्लेट्स मध्ये ब्लास्ट झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.