Driver Beating : चालकाला मारहाण केल्याने मिरा भाईंदर परिवहन सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बस चालकाला सेवेच्या कंत्राटदाराच्याच मुलाने मारहाण केल्याने परिवहन कर्मचार्‍यांनी बुधवारी सायंकाळी काम बंद आंदोलन सुरु केले.
Bhayander transport service stopped
Bhayander transport service stoppedsakal
Summary

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बस चालकाला सेवेच्या कंत्राटदाराच्याच मुलाने मारहाण केल्याने परिवहन कर्मचार्‍यांनी बुधवारी सायंकाळी काम बंद आंदोलन सुरु केले.

भाईंदर - मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बस चालकाला सेवेच्या कंत्राटदाराच्याच मुलाने मारहाण केल्याने परिवहन कर्मचार्‍यांनी बुधवारी सायंकाळी काम बंद आंदोलन सुरु केले. परिणामी शहरातील संपूर्ण बससेवा ठप्प झाली. सायंकाळी कामावरुन परतण्याच्या वेळीच बससेवा बंद झाल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. रात्री उशिरापर्यंत बस बंदच होत्या.

महापालिकेची परिवहन सेवा महालक्ष्मी कृपा इन्फ्रास्ट्रकचर या कंत्राटदाराच्या माध्यमातून चालविण्यात येते. परिवहन सेवेची मिरा रोड रेल्वे स्थानक ते विनय नगर या सतरा क्रमांकाच्या मार्गावरील बस दुपारी साडे तीनच्या सुमारास मिरा रोड एस के स्टोन नाक्यावर आली असताना कंत्राटदाराचा मुलगा बसच्या मागून दुचाकीवरुन येत होता. बस चालकाने त्याला पुढे जायला दिले नाही याचा राग आल्याने त्याने आपली दुचाकी बसच्या पुढे घेतली व बस थांबवण्यास भाग पाडले. खाली उतरलेल्या रामेश्वर बिडवे या बस चालकाला कंत्राटदाराच्या मुलाने शिविगाळ केली व त्याच्या थोबाडीत ठेवून दिली. ही सर्व घटना बस मध्ये बसलेल्या प्रवाशांनी आपल्या मोबाईलवर चित्रित केली. त्यानंतर ही चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल झाली.

चालकाला मारहाण झाल्याने परिवहन सेवेतील सर्व कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले. मारहाण करणार्‍यावर गुन्हा दाखल करुन कंत्राटदारावर कारवाई करा अशी मागणी कर्मचार्‍यांनी प्रशासनाकडे केली. त्यामुळे परिवहन सेवेची शहरातील सर्वच सेवा ठप्प झाली. सायंकाळी कामावरुन परतण्याची ही वेळ असतानाच बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. बस थांब्यावर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. भाईम्दर व मिरा रोड रेल्वे स्थानकबाहेरही प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.  उत्तन, चौक तसेच मिरा रोडच्या अंतर्गत भागात रहाणार्‍या प्रवाशांना त्याचा सर्वाधिक फटका बसला. या प्रकरणी प्रशासनाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी न झाल्याने रात्री उशिरा पर्यंत बस बंदच होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com