esakal | मुंबई : भेंडी बाजाराचा पुनर्विकास होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : भेंडी बाजाराचा पुनर्विकास होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भेंडी बाजाराच्या पुनर्विकासासाठी मुंबई (Mumbai) पालिकेने २४ भूखंडांचे हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भेंडी बाजाराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या भूखंडाच्या मोबदल्यात विकसक दुसऱ्या भूखंडासह फरकाचे २१ कोटी रुपयेही देणार आहे.

मुंबईतील पहिला समूह विकास (क्लस्टर डेव्हलपेमेंट) म्हणून भेंडी बाजाराच्या पुनर्विकासाची ओळख आहे. या पुनर्विकासाच्या क्षेत्रात पालिकेचे २४ भूखंड असल्याने पुनर्विकासात अडथळे येत होते. गेल्या सात वर्षांपासून यावर तोडगा न निघाल्याने पुनर्विकासाच्या कामावर मर्यादा आल्या होत्या. विकसकाने या भूखंडाच्या बदल्यात पालिकेला एक किलोमीटरच्या परिसरात पर्यायी भूखंड देण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच किमतीच्या फरकाची रक्कम देण्याची तयारीही दाखवली होती. प्रशासकीय मंजुरीनंतर हे भूखंड हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला बुधवारी सुधार समितीत मंजुरी देण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष सदानंद परब यांनी सांगितले.

हेही वाचा: 'गोव्यात फोडाफोडीचं राजकारण, शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढणार'

भुलेश्वर मांडवीत जागा पॉलिकेला मांडवी येथील बाबुला टंक रोडनजीक चार हजार ९७ चौरसमीटरचा एक आणि भुलेश्वर येथे मौलाना आझाद मार्गावर ४४७ चौरसमीटरची जागा मिळणार आहे.

loading image
go to top