esakal | भिवंडी : लोकअदालतमध्ये ९१ लाखांची वसुली
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भिवंडी : लोकअदालतमध्ये ९१ लाखांची वसुली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वज्रेश्वरी : भिवंडी (Bhiwandi) पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या सर्व ग्रामपंचायतींची लाखो रुपये घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये यकवाकीचे दावे निकाली काढण्यात आले.

त्यातून तब्बल ९९ लाखांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. संबंधित नागरिकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी राजू भोसले, इंद्रजित काळे, सोनावणे आणि दीपक देवरे आदींसह संबंधित ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक यांनी नागरिकांकडून तब्बल ९१ लाख ८३ हजार ६१६ रुपयांची घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल केली.

हेही वाचा: गुड्डु पंडित पैसे कमविण्यासाठी कॉल सेंटरमध्ये जायचा त्यातून त्यानं...  

सर्वाधिक थकीत १९ लाखांची वसूल अंबाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. ग्रामसेवक दिलीप जाधव, अंबाडी ग्रामपंचायतीचे लिपिक बळीराम पाटील यांनी यासाठी. पुढाकार घेतला.

loading image
go to top