भिवंडी : पडघा येथे भागवत एकादशी उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भिवंडी : पडघा येथे भागवत एकादशी उत्साहात साजरी

पडघा : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे भागवत एकादशी विविध आध्यात्मिक कार्यक्रमाद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. दिवाळीनंतर येणारी भागवत एकादशी म्हणजेच पंढरपूर यात्रेला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे.

हेही वाचा: इस्लामपुरात शिवसैनिक आक्रमक: नगरपालिकेची तिसरी विशेष सभाही रद्द!

त्यानुसार सोमवारी पडघा येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरात एकादशीचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी सकाळी काकड आरती, अभिषेक, भजन, प्रवचन, महाआरती हरिपाठ व कीर्तन आदी आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संत तुकाराम महाराज मंदिर भजन मंडळाच्या वतीने सुश्राव्य असे भजन सादर करण्यात आले.

loading image
go to top