

Bhiwandi Building Collapse
ESakal
मुंबई : भिवंडीत चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भंडारी कंपाउंडमधील गंगाराम वाडी येथील कोहिनूर अपार्टमेंटची बी विंग कोसळून यामध्ये ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही जण इमारतीच्या मलब्यात अडकले असून NDRF आणि TDRF च्या पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पीडितांनी या घटनेचा थरार सांगितला आहे.