

Bhiwandi Shawarma Poisoning
ESakal
भिवंडी : भिवंडीत वंजारपट्टी नाका परिसरातील ए. के. शोरमा येथील शोरमा खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अन्नबाधा झालेल्या रुग्णांची संख्या ११६ वर पोहोचली असून विषबाधा झालेल्या ११६ यापैकी १०३ जणांवर स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये १०३ जणांमध्ये ५० पुरुष, ३२ महिला आणि २१ लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेने उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.