esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भिवंडी : पत्नीकडून मित्राच्या मदतीने पतीची हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : तालुक्यातील कांबा गावात पागीपाडा येथे राहणारा पती आपल्या पत्नीवर वारंवार संशय घेऊन तिला बोलत असे. त्याचा राग मनात धरून अखेर पत्नीनेच मित्राशी संगनमत करून पतीची गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आज दोघा आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा: सातारा : कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या शिरला गावात

संजय काशिनाथ पागी (वय ३८) असे मृत पतीचे नाव आहे. त्यांच्या घरी पत्नीने मानलेला भाऊ मित्र अक्षय काळण (रा. वडपा) हा यत असे. त्याच्यावर संशय घेऊन संजय पत्नी सविता हिला नेहमी बोलत असे. या भांडणाला कंटाळून सविता हिने रविवारी दुपारी तीन वाजता मित्राच्या मदतीने संजय याचा गळा दाबून त्याची हत्या केली. याबाबत पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

loading image
go to top