बनावट लेबलद्वारे विडी विक्री करणाऱ्या दुकानदाराविरोधात भिवंडीत गुन्हा

बनावट लेबलद्वारे विडी विकणाऱ्या दुकानदाराविरोधात भिवंडीत गुन्हा
बनावट लेबलद्वारे विडी विकणाऱ्या दुकानदाराविरोधात भिवंडीत गुन्हा

भिवंडी : भिवंडी शहर परिसरात बनावट लेबल लाऊन अन्न पदार्थ व तंबाखूजन्य पानमसाला, गुटखा सारखे पदार्थ विक्री करण्याचे प्रकार उघडकीस येत असताना आता नामांकित कंपनीचे लेबल नावाचा वापर करून विडी विक्री करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी छापा मारून नकली बनावट वीडीचे खोक्यासह हजारो रुपये किमतीचा माल ताब्यात घेतला असून, दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी शहरात संभाजी ,मोहिनी व राजकमल या सुप्रसिद्ध ब्रँडच्या बनावट नकली विडी मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याबाबत उत्पादक साबळे-वाघिरे अँड कंपनी प्रा.लि. या कंपनीस सुगावा लागला होता. त्यानुसार कॉपीराईट कायद्याअंतर्गत काम पाहणाऱ्या मोहम्मद गौस उस्मान खान यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली. 

या तक्रारीनुसार भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण कपेँ यांच्या विशेष पथकाने  जुना ठाणा रोड येथील ताज सुपारी स्टोअर्स येथे छापा मारून तपासणी केली असता दुकानात संभाजी विडी चे 96, मोहिनी विडी चे 144, राजकमल विडीचे 28 असे एकूण 84 हजार 240 रुपये किमतीचे 266 बॉक्स बनावट विडी आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी दुकान मालक सिफान मोहम्मद आरिफ शेख या विरोधात कॉपीराईट कायदा 1957 चे कलम 52 ,63 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com