भिवंडी : अतिक्रमणांनी केला कुडूस नाका गिळंकृत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भिवंडी : अतिक्रमणांनी केला कुडूस नाका गिळंकृत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाडा : भिवंडी- वाडा- मनोर मार्गावरील कुडूस नाक्याचा बहुतांश भाग हातगाड्या, टपऱ्या, फळे-भाजी विक्रेते यांनी व्यापला आहे; तर उर्वरित भागात वाहनांचे पार्किंग होत असल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होत असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील कुडूस हे बाजारपेठेचे मुख्य गाव आहे. ५२ गावांची बाजारपेठ आहे. त्यामुळे हजारो नागरिकांची ये-जा या नाक्यावर असते. येथे टपऱ्या हातगाड्या आणि भाजी-फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडल्याने अडथळे निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांना अतिक्रमणांमुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पदपथावर गाड्या लावण्यात आल्या आहेत. दुकानदारांनीही रस्त्यावर टपऱ्या लावल्या आहेत.

हेही वाचा: Video : मुख्याध्यापिकेने दिली ही अमानवी शिक्षा... विद्यार्थिनींना चालणेही झाले मुश्कील

शुक्रवारी येथे आठवडा बाजार असल्याने हजारो नागरिकांची गर्दी असते. या वेळी रस्त्यावरच नागरिक दुचाकी, चारचाकी उभी करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. बांधकाम खाते, पोलिस खाते आणि ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेऊन अतिक्रमणे त्वरित हटविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

हेही वाचा: Pune : हडपसर- तुकाईदर्शन येथे तलवारीने वार करणारे तिघे जेरबंद

बसथांब्यांना विळखा
कुडूस नाका येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील बसथांब्यांना हातगाड्यांनी विळखा घालण्यात आला आहे. काही विक्रेते तर बसथांब्यांमध्ये बसून व्यवसाय करीत आहेत. वाड्याच्या दिशेकडील थांब्याशेजारी वडापावची टपरी आहे. त्यामुळे या भागात गर्दी होत असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

loading image
go to top