

Bhushan Gagrani inspects Bhandup complex
ESakal
मुंबई : वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येचा वाढता ताण लक्षात घेता, शाश्वत जलव्यवस्थापनासाठी मलजल प्रक्रिया प्रकल्प अत्यंत कळीचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जलप्रदूषण रोखण्यास मदत होईलच, शिवाय प्रक्रिया केलेले पाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध झाल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्यातील तूट भरून काढणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले.