ट्रिंग-ट्रिंग करत, नालासोपारावासी पुन्हा सायकलवर स्वार!

नालासोपारा ः पूर्व परिसरात लावण्यात आलेल्या शेकडो सायकली.
नालासोपारा ः पूर्व परिसरात लावण्यात आलेल्या शेकडो सायकली.
Updated on

वसई ः दुचाकी, चारचाकी वाहनांचा कर्कश आवाज, प्रदूषण आणि कोंडी हे चित्र वसई तालुक्‍यात नित्याचे आहे; मात्र यातून मुक्तता मिळवण्यासाठी आता नालासोपाऱ्यात सायकलप्रेमींची संख्या वाढली आहे.

कोंडीतून मुक्ततेबरोबरच सायकल चालवण्याचे अन्य फायदेही अधिक असल्याने शेकडो नोकदरार ट्रिंग-ट्रिंग करत सायकलीवर स्वार होऊन कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. यात त्यांचा थोडा अधिक वळे खर्ची होत असला तरी त्यांची प्रदूषण आणि कोंडीतून सुटका होत असल्याने अनेकांनी अडगळीतील सायकली पुन्हा बाहेर काढल्या आहेत, तर काहींनी चक्क नवीन सायकली घेऊन त्यांचा वापर सुरू केला आहे.  

वसई तालुक्‍यात पूर्वी शेतकरी, दूधव्यावसायिक, दुकानदार यांच्यासह सामान्य नागरिक सायकलीवरूनच लांबचा पल्ला गाठत असत. लहान मुलेही भाड्याने सायकल घेऊन ती चालविण्याची मजा घेत असत; परंतु काळाच्या ओघात सायकल दिसेनाशी झाली आणि त्याची जागा दुचाकी, चारचाकी वाहनांनी घेतली. मुलांना शाळेत सोडण्यासाठी, कामावर जाण्यासाठी दुचाकींचा वापर होऊ लागला.

वसई तालुक्‍यातील रस्ते वाहनांनी गजबजले गेले आणि सर्वत्र कोंडीच कोंडी सुरू झाली. सध्या त्यांची संख्या इतकी वाढली आहे, की यातून वाट काढणे कठीण होऊन बसले आहे. अनेक मार्गांवर तासन्‌ तास अडकून रहावे लागत आहे. वसई स्थानक परिसर, नालासोपारा तुळिंज, संतोष भुवन, उड्डाणपूल, विरार पूर्वेकडील मार्ग यासह माणिकपूर, गोखिवरे, वालीव, वसई उड्डाणपूल, नवघर, फादरवाडी, रेंज ऑफिस, सातिवलीसह अन्य मार्गांवर नेहमीच कोंडी असते. त्यातून मार्ग काढणे जिकिरीचे होते.

यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. रस्ते रुंद झाले असले, तरी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर मात करणे कठीण जात आहे; मात्र यावर काही प्रवाशांनी युक्ती शोधली असून त्यांनी सायकलींचा वापर सुरू केला आहे. 

स्थानक परिसरात पार्किंग
सकाळच्या सुमारास नालासोपारा पूर्वेला स्थानक परिसरात एकाच ठिकाणी अनेक सायकली घेऊन प्रवासी येतात. सायकल लावून कामावर जातात आणि पुन्हा सायंकाळी सायकलने घरचा प्रवास करत आहेत. रोजच वाहनांची कोंडी असते, त्यापेक्षा सायकल बरी. व्यायामही होतो, इंधन लागत नाही आणि पर्यावरणालादेखील कोणताही धोका निर्माण होत नाही. शिवाय कोंडीतून मार्ग काढणेदेखील सहज शक्‍य होत असल्यामुळे कोंडीची पर्वा न करता ट्रिंग-ट्रिंग करत शेकडो नालासोपारावासी प्रवास करत आहेत.

खासगी वाहनातून प्रवास करताना नालासोपारा पूर्वेला रोजच कोंडीचा सामना करावा लागतो. त्यापेक्षा सायकलचा प्रवास अत्यंत सुलभ होत आहे. कोंडीतून सायकल सहज निघते. पूर्वेला सायकल ठेवून पुढचा प्रवास करतो.
अभिषेक झा, सायकलस्वार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com