esakal | कोरोना नव्हे, थंडीमुळे मासे महागले...
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

मासळी बाजाराला कोरोना विषाणूचा नव्हे, तर थंडीचा फटका बसला आहे. थंडीमुळे बोटी समुद्रात पाठवल्या जात नाहीत, गेल्या तरी मासे सापडत नाहीत. त्यामुळे राज्यभरातील बाजारात पुन्हा माशांचा दुष्काळ निर्माण झाला असून किमती ५० टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत.

कोरोना नव्हे, थंडीमुळे मासे महागले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मासळी बाजाराला कोरोना विषाणूचा नव्हे, तर थंडीचा फटका बसला आहे. थंडीमुळे बोटी समुद्रात पाठवल्या जात नाहीत, गेल्या तरी मासे सापडत नाहीत. त्यामुळे राज्यभरातील बाजारात पुन्हा माशांचा दुष्काळ निर्माण झाला असून किमती ५० टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे चिकन-मटणच्या विक्रीवर परिणाम झालेला असतानाच मासेही महागल्याने मांसाहारी थंडावले आहेत.

धक्कादायक : धावत्या लोकलवर फेकली जातायत कुत्र्याची पिल्लं

चीनमधील कोरोना विषाणूच्या भीतीमुळे मटणाचा खप कमी झाला असून, दरही कमी झाले आहेत. कोरोनामुळे मासळी बाजाराला फटका बसल्याचे दिसत नाही; परंतु थंडी लांबल्याने समुद्रात मासे मिळत नसल्याचे सांगण्यात आले. थंडीत बोटी समुद्रात पाठवल्या जात नाहीत. बोटी गेल्या, तरी या काळात समुद्राच्या तळात गेलेले मासे जाळ्यात सापडत नाहीत, असे महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे किरण कोळी यांनी सांगितले.

हेही वाचा : ब्रेकअपनंतर बर्गर फ्री, वाचा काय आहे गुड न्यूज...! ​

पर्ससीन, एलईडीचेही संकट 
राज्यात पर्ससीन जाळे आणि एलईडी दिव्यांच्या मदतीने होणाऱ्या मासेमारीवर बंदी आहे; परंतु आजही अशा प्रकारे मासेमारी होत असल्याचा आरोप कोळी समाजाचे नेते दामोदर तांडेल यांनी केला. या प्रकारच्या मासेमारीवर कठोर कारवाई न केल्यास पारंपरिक मासेमारी संपून जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

यंदा पावसाळ्यानंतर समुद्रात आलेल्या वादळांमुळे मासेमारी बंद ठेवावी लागली होती. त्यानंतर आता थंडीचा मोसम लांबल्यानेही मासेमारीला फटका बसला आहे. मत्स्यदुष्काळामुळे माशांचे दर घाऊक बाजारात जवळजवळ दुप्पट आणि किरकोळ बाजारात ५० टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.
- किरण कोळी, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

किरकोळ बाजारात... (किलो/रुपये) 
       
मासे                  पूर्वी               आता 

  1. पापलेट              ७०० ते ८००     १२००
  2. सुरमई               ४००               ६०० ते ७००
  3. रावस                 ४००               ५०० ते ६००
  4. घोळ                  ४००               ७०० ते ८००
  5. कोळंबी (मोठी)    ४००               ७०० ते ८००
  6. कोळंबी (मध्यम)  १५० ते २००      ४०० ते ५००
loading image
go to top