Highway: मुंबई-पुणे द्रुतगतीवरील अपघातांमध्ये मोठी घट; मात्र वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन

mumbai pune express way
mumbai pune express way sakal media

Highway: रस्ते विकास महामंडळ व महामार्ग पोलिसांच्या विविध उपाययोजनांमुळे यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात घटले, परंतु वाहने अद्याप सुसाटच आहेत. या महामार्गावर भरधाव वाहने एका मिनिटात दोन किलोमीटर अंतर कापतात. त्‍यामुळे वाहनांच्‍या वेगावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्‍याचे बोलले जात आहे.


मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर होणारे अपघात कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर दक्षता घेऊन रस्ते विकास महामंडळ व महामार्ग पोलिसांनी विविध उपाययोजना राबवल्या. यात अपघातग्रस्त ठिकाणी ठराविक अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे, वेग मोजण्यासाठी स्पीड गनचा वापर, गतिरोधक पट्टे, धोकादायक ठिकाणी सूचना फलक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, आदी उपाययोजना करण्यात आल्याने यावर्षी होणाऱ्या अपघातात निम्म्याने घट झाली आहे.

mumbai pune express way
Nagar-Kalyan Highway Accident : नगर-कल्याण हायवेवर ट्रकने दोन वाहनांना उडवलं; अपघातात एकाच कुंटुंबातील चौघांसह ८ जण जागीच ठार

महामार्ग पोलिस व परिवहन विभागानेही यावर्षी द्रुतगती मार्गावर लक्ष केंद्रित करून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर संयुक्त दंडात्मक कारवाई केली. यातून काही मंत्री व वरिष्ठही सुटले नाहीत. याचा फायदा अपघात संख्या घटली. परंतु वाहनचालकांची वाहने अद्याप सुसाटच आहेत. द्रुतगती मार्गावर हलक्या वाहनांसाठी वेगमर्यादा ताशी १०० किलोमीटर, तर जड वाहनांसाठी ताशी ८० किलोमीटरची असतानाही हा नियम अनेकजण मोडताना दिसून येत आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होतेच, तरीही वेग मयदिचे उल्लंघन केले जाते. त्यांना आता प्रबोधनाची गरज आहे.

अशी होते वेगवान वाहनांवर कारवाई
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी राज्य महामार्ग पोलिसांनी फ्रान्स बनावटीचे 'मेस्टा फ्यूजन' है स्वयंचलित यंत्र देशात सर्वात प्रथम येथील महामार्गावर बसवले आहे. हे यंत्र वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती छायाचित्रांच्या पुराव्यासह एका क्लिकवर उपलब्ध करून देते. संबंधित वाहनांचे छायाचित्र टिपल्यानंतर महामार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये ते काही सेकंदातच उपलब्ध होते. संबंधित वाहनचालकाला एक हजार रुपयांचा दंड आणि त्याचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाटवला जातो.

mumbai pune express way
Mumbai-Goa Highway : उड्डाणपुलाचे गर्डर हटवताना महामार्गाची एक लेन बंद होणार? प्रशासन महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

दोन हजाराचा दंड
द्रुतगती महामार्गावर बोर घाटात चढणामुळे वाहनांचा वेग मंदावतो. परिणामी अवजड वाहने ही मंद गतीने हे चढण चढतात. त्या मुळे याठिकाणी चारचाकींचा खोळंबा होतो. त्या कोंडीतून बाहेर पडल्या नंतर वाहनचालक वेळ वाचवण्याच्या नादात सुसाट वाहने पळवतात. त्यावेळी मार्गावरील स्वयंचलित कॅमेरे वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे फ्लॉश मारून फोटो काढले जातात व तत्काळ तुमच्या मोबाईल मध्ये २ हजार रूपये दंड झाल्याचा संदेश झळकतो.

गेल्या पाच वर्षांत झालेले अपघात
वर्ष
२०१९
अपघात - ६०
जखमी - २१०
मृत्यू - ६१

२०२०
अपघात - ५३
जखमी - २०७
मृत्यू - ६०

२०२१
अपघात - ४०
जखमी - ८७
मृत्यू - ४०

२०२२
अपघात - ३३
जखमी - १३०
मृत्यू - ५०

२०२३ डिसेंबर २८ अखेर
अपघात - १५
जखमी - ३४
मृत्यू- २३

mumbai pune express way
Mumbai Agra Highway: मुंबई महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा; अपघातप्रवण क्षेत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com