esakal | पुढील आठवड्यापासून घुमणार लाईट, कॅमेरा अॅण्ड अॅक्शनचे सूर....
sakal

बोलून बातमी शोधा

film shooting

कोरोनामुळे भारतातील चित्रपटगृहे तसेच सगळीकडील चित्रीकरण बंद ठेवण्यात आले होते. आता महाराष्ट्रात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे आणि सरकारने काही ठिकाणी नियमात शिथिलता दिली आहे.

पुढील आठवड्यापासून घुमणार लाईट, कॅमेरा अॅण्ड अॅक्शनचे सूर....

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती. सगळीकडील चित्रीकरण बंद होते. मात्र, आता पुन्हा गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी तसेच आसपासच्या परिसरातील टीव्ही मालिकांचे चित्रीकरण पुढील आठवड्यामध्ये सुरू होणार आहे. सरकारच्या परवानगीनेच हे चित्रीकरण होणार असून सर्व नियम आणि अटीचे पालन करण्यात येणार आहे. अर्थात पुन्हा लाईट, कॅमेरा आणि अॅक्शनचे सूर ऐकू येणार आहेत.

माहिम रेल्वेस्थानकावर कोरोना वॉरिअर्सना अनोखी मानवंदना

कोरोनामुळे भारतातील चित्रपटगृहे तसेच सगळीकडील चित्रीकरण बंद ठेवण्यात आले होते. आता महाराष्ट्रात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे आणि सरकारने काही ठिकाणी नियमात शिथिलता दिली आहे. टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणासही सरकारने या महिन्याच्या सुरुवातीलाच परवानगी दिली होती. परंतु ती देताना सरकारने बऱ्याच नियम आणि अटी घातल्या होत्या. या नियम आणि अटींबाबत सिंटा तसेच फेडरेशन या चित्रपट आणि टीव्हीशी संबंधित संघटनांमध्ये चर्चा झाली.  त्यानंतर विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि आता पुढील आठवड्यापासून चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आता सादिकचा गेमच करतो म्हणत नवनीत पहाटे चार वाजता गेला सादिकच्या घरी, सादिकने दरवाजा उघडला आणि....

याबाबत फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन.  तिवारी म्हणाले, की गोरेगाव चित्रनगरीत काही टीव्ही मालिकांचे चित्रीकरण 23 जूनपासून सुरू होत आहे. ज्या मालिकांचे चित्रीकरण होणार आहे, त्यांच्या संपूर्ण युनिट चित्रनगरीत किंवा आसपासच्या हॉटेलमध्ये राहणार आहे. संपूर्ण सेट चित्रीकरणापूर्वी सॅनिटाईज केला जाणार आहे. सेटिंगवाल्यांचे काम झाले की त्यांनी सेटवर थांबायचे नाही तर त्यांनी बाहेर येऊन थांबायचे आहे. कलाकारांचे मेकअपमन एकदाच त्यांचा मेकअप करतील आणि त्यानंतर तो बाहेर येऊन बसेल. प्रत्येकाला मास्क लावावा लागणार आहे. 
बाहेरील कोणत्याही व्यक्तीला सेटवर प्रवेश नसेल.

मुंबई पूर्व उपनगरामध्ये नागरिक सहन करतायेत 'हा' नाहक त्रास...

65 वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला किंवा कलाकाराला तसेच 10 वर्षाखालील कोणत्याही मुलाला वा कलाकाराला सेटवर एन्ट्री नसणार आहे. चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जाईल. आणि त्याच्याकडून परिसरात कुणी कोरोना पॉझिटिव्ह नाही ना तसेच त्याला स्वतःला कोणता आजार नाही ना, याबाबतचा एक फॉर्म भरून घेतला जाईल. मालिकेच्या निर्मात्याने तसेच वाहिनीने प्रत्येक व्यक्तीचा 50 लाख रुपयांचा विमा उतरविला आहे की नाही, याची खातरजमा केली जाईल. 

पालिकेच्या हेल्पलाईनवर वाढले 'चिंतेचे कॉल'! कोव्हिड महामारीमुळे भीतीमध्ये भर

प्रत्येक सेटवर वैद्यकीय अधिकारी व अॅम्बुलन्सची सोय असणार आहे. झी मराठीवरील अगंबाई सासुबाई या मालिकेच्या चित्रीकरणासही पुढील आठवड्यात सुरुवात होत आहे. निर्माते सुनील भोसले म्हणाले, की आम्ही सरकारची परवानगी घेतली आहे. आता दोन-तीन दिवसांमध्ये अन्य कामे आटोपून पुढील आठवड्यात चित्रीकरण करणार आहे.

क्या बात..! 92 वर्षीय आजीबाईंनी केली कोरोनावर मात...

चित्रपटाचे शूटिंगही लवकरच
मुंबई तसेच आसपासच्या चित्रीकरणासाठी सरकारने परवानगी दिली आणि आता टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरू होत आहे. मात्र चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होणार हे अद्याप सांगण्यात आले नाही. मात्र लवकरच चित्रीकरण चित्रपटाचेही सुरू होईल हे निश्चित.