esakal | ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा? शिक्षण विभागाच्याच सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती....
sakal

बोलून बातमी शोधा

online education.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल, टीव्ही आणि रेडिओ यापैकी कोणतेही साधन उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा? शिक्षण विभागाच्याच सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सुमारे 10 टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल, टीव्ही आणि रेडिओ यापैकी कोणतेही साधन उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्याचप्रमाणे 31 टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही, तर 35 टक्के विद्यार्थ्यांकडे टीव्ही नाही; त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुढील आठवड्यापासून घुमणार लाईट, कॅमेरा अॅण्ड अॅक्शनचे सूर....

ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांकडे कोणती साधने उपलब्ध आहेत, याचे सर्वेक्षण केले. मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 31.76 टक्के आहे, तर 35 टक्के विद्यार्थ्यांकडे टीव्ही नाही. ग्रामीण, आदिवासी पट्ट्यातील 10 टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी टीव्ही, मोबाईल, रेडिओ आणि अन्य कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत.

आता हे काय नवीन; म्हणे 2011 वर्ल्डकपचा अंतिम सामना फिक्स होता.. वाचा कोणी केलाय हा आरोप...​

टीव्ही, मोबाईल, रेडिओ नसलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर आघाडीवर आहे. तेथे तब्बल 37.48 टक्के विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यापाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यात 36.26 टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी साधने नाहीत. नंदूरबारमध्ये 29.87 टक्के, जालन्यात 25.59 टक्के, धुळ्यात 24.16 टक्के, अमरावतीत 24.27 टक्के, नाशिकमध्ये 20.84 टक्के, यवतमाळमध्ये 19.45 टक्के आणि वाशिममध्ये 19.97 टक्के विद्यार्थ्यांकडे टीव्ही, मोबाईल, रेडिओ नाही.

सुशांत सिंग आत्महत्याप्रकरणी नजीकच्या व्यक्तीचा नोंदवला जबाब...​

मोबाईलही उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्याही पालघरमध्येच आहे. पालघरमधील 37.48 टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईलही नाही. गडचिरोलीत 36.23 टक्के, नंदूरबारमध्ये 55.68 टक्के, जालन्यात 31.66 टक्के, धुळ्यात 35.39 टक्के, अमरावतीमध्ये 41.78 टक्के, नाशिकमध्ये 24.94 टक्के, यवतमाळमध्ये 25.80 टक्के आणि वाशिममध्ये 36.21 टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. राज्यातील केवळ 61 टक्के विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क होऊ शकतो. सुमारे 39 टक्के विद्यार्थी व्हॉट्सअॅपच्या संपर्काबाहेर आहेत.