गणेश नाईकांना मोठा धक्का; कट्टर समर्थक सोडतायेत साथ...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक तथा स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी हे भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल होणार आहेत. शुक्रवारी (ता.7) आयोजित एका हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमादरम्यान यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आमदार गणेश नाईक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 

नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक तथा स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी हे भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल होणार आहेत. शुक्रवारी (ता.7) आयोजित एका हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमादरम्यान यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आमदार गणेश नाईक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 

ही बातमी वाचली का? हवालदाराचा अपघाती मृत्यू

सुरेश कुलकर्णी यांचे पुत्र महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली "शिवप्रेरणा' व "स्वामी समर्थ महिला मंडळा'च्या वतीने रविवारी (ता.9) हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, शहरप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, विजय माने; तसेच स्वत: सुरेश कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांच्या मांदियाळीमुळे कुलकर्णी यांच्या शिवसेना प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. समारंभाच्या माध्यमातून सुरेश कुलकर्णी यांनी प्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करीत, आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केल्याचे बोलले जात आहे. 

ही बातमी वाचली का? संरक्षक कठड्यालाच कारची धडक

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मागील 25 वर्षे पालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. या वेळी सत्तांतर करण्याच्या दृष्टीने शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याचा निर्धार केला आहे. नाईकांची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडीकडून व्यूहरचना केली जात आहे. नाईक गटातील दहा ते 15 नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच शुक्रवारी तुर्भेत पार पडलेल्या हळदीकुंकू समारंभात याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. 

ही बातमी वाचली का? पाचशे रुपयांसाठी केला ब्लेडने हल्ला
 
केवळ औपचारिकता शिल्लक 
सुरेश कुलकर्णी यांचा तुर्भे परिसरात प्रभाव आहे. त्यामुळे या परिसरातील चार समर्थक नगरसेवकांसह ते शिवसेनेत प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. शुक्रवारच्या कार्यक्रमानंतर कुलकर्णी यांच्यासह तुर्भे विभागातील नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक राहिल्याचे बोलले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A big shock to Ganesh Naik Suresh Kulkarni on the way to Shiv Sena