तुर्भेमध्ये तलवारीने केक कापणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून मित्रांचीही धरपकड

तुर्भेमध्ये तलवारीने केक कापणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून मित्रांचीही धरपकड

मुंबईः तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे तुर्भे नाका येथे राहणाऱ्या तरुणाला आणि त्याच्या मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या तरुणासह त्याच्या 18 ते 20 मित्रांवर शस्त्र अधिनयमानुसार गुन्हा दाखल करुन त्यांची धरपकड सुरु केली आहे. या तरुणांनी गेल्या 26 डिसेंबरला भररस्त्यात वाढदिवस साजरा करत तलवारीने केक कापला होता. त्यानंतर या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागल्यांनतर पोलिसांनी स्वत:हून या तरुणांवर कारवाई केली आहे. 

तुर्भे नाका येथील हनुमान नगर भागात रहाणाऱ्या महेश नंदलाल हलवाई (25) या तरुणाचा गेल्या  26 डिसेंबरला वाढदिवस होता. महेश हलवाई हा तुर्भे नाका येथील शिवसेना वार्ड क्रमांक 71 चा शाखा प्रमुख आहे. तसेच उत्तर भारतीय सेनेचा उपशहर प्रमुख आहे.

महेशच्या 18 ते 20 मित्रांनी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तुर्भे नाका येथील हनुमान नगरमध्ये भर रस्त्यावर त्याचा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी महेश हलवाई याने आपल्या मित्रांच्यासोबत वाढदिवसाचा केक तलवारीने कापला होता. त्यावेळी महेश हलवाई याच्या मित्रांनी तलवारीने केक कापतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. 

दरम्यान वाढदिवसाचा हा व्हिडीओ तुर्भे एमआयडीसी पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तलवारीने केक कापणाऱ्या महेश हलवाई त्याच्या 18 ते 20 मित्रांवर शस्त्र अधिनयम, महाराष्ट्र पोलिस अधिनियम तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्यावर कारवाईला सुरुवात केली आहे.  

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Birthday cake cutting with sword young boy Turbhe Naka registered case

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com