कारल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 February 2020

कारल्याची निर्यात मंदावल्याने त्याच्या भावात प्रति किलोला १० ते १५ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कारले उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

रोहा (बातमीदार) : कारल्याची निर्यात मंदावल्याने त्याच्या भावात प्रति किलोला १० ते १५ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कारले उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

गेल्या वर्षी उन्हाळी हंगामात कारल्याला प्रति किलो ३० ते ३५ रुपये भाव मिळाला होता. यंदा त्याच्या भावात घसरण झाली असून १८ ते २० रुपये भाव आहे. आखाती देशांसह चीन, तैवान आदी देशात त्याची निर्यात होते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

कुठे जाण्याचा प्‍लान करणार असणार तर हे आधी वाचा... रेल्‍वेचा रविवारी मेगाब्‍लॉक

जिल्हाभरात सुमारे दीड हजार हजार एकरवर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. भाव कोसळल्याने या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे खजिनदार दगडू बामुगडे यांनी सांगितले. 

कारल्याच्या शेतांची चांगली मशागत आणि  पिकाची काळजी घेतल्यास चांगले उत्पादन मिळते. प्रति एकर १ टन उत्पादन निघते. उन्हाळी हंगामात २५ ते २७ तोड घेतली जाते. म्हणजेच १ एकर जमिनीतून २५ ते २७ टन उत्पादन मिळते, असे गडबल येथील  शेतकरी परशुराम म्हात्रे 
यांनी सांगितले. 

महापालिका इमारतींचे ‘फायर ऑडिट’ ... कोणत्‍या आहेत त्‍या इमारती ते वाचा

कारल्याची निर्यात मुख्यत्वे आखाती देशात होते. ती थोडीफार मंदावली आहे. मात्र निश्‍चित कारण सांगता येत नाही.
- कैलास ताजने, भाजीपाला व्यापारी 

मागील वर्षीच्या तुलनेत कारल्याचे भाव फारच उतरले आहेत. शेतकऱ्यांना प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका पडत आहे. 
- गणेश गावडे, शेतकरी, धोंडखार 

राज्यात कारल्याचे पीक चांगले आल्याने बाजारात आवक वाढली आहे. निर्यातसुद्धा मंदावली असल्याने या वर्षी भाव घसरले आहेत.
- शंकर पिंगळे, भाजीपाला व्यापारी, नवी मुंबई

अबब... एवढा मोठा मासा जाळ्यात ... कोणता मासा ते वाचा सविस्तर

दृष्टिक्षेप
कारल्याचे क्षेत्र : १५०० एकर
गेल्या वर्षीचा भाव : ३५ रुपये 
यंदाचा भाव : २० रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bitter melon's price down