

Palghar Nagar Parishad
ESakal
पालघर : नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा नोव्हेंबरमधील पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी विविध पक्षांतील इच्छुकांनी आपल्या परीने सुरू केली आहे. नगर परिषदेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती होण्याची शक्यता दुरावल्याचे दिसून येत आहे. नगराध्यक्षपदासाठी या दोन्ही पक्षांमधून इच्छुकांची गर्दी झाली असून, त्यांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत.