

Ambernath BJP & Shivsena Fight
ESakal
अंबरनाथ : राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत धुसफूस अंबरनाथ नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत चव्हाट्यावर आली आहे. तब्बल आठ वर्षांच्या दीर्घकाळानंतर शुक्रवारी (ता. १३) पार पडलेली ही पहिलीच सभा शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे वादळी ठरली. शिवसेनेने आपल्या संख्याबळाच्या जोरावर भाजप नगरसेवकांच्या प्रभागांतील विकासकामांना विरोध दर्शविल्याने अंबरनाथमध्ये महायुतीत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.