

BJP & Shivsena Fight
ESakal
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून राजकीय वातावरण तापले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि शहर अभियंता कार्यालयात अनुपस्थित असल्याच्या मुद्द्यावरून भाजपकडून आंदोलन करण्यात आले. परिणामी यावर शिवसेना देखील आक्रमक झाली असून महायुतीचा वाद चव्हाट्यावर आला असल्याचे समोर आले आहे.