
मुंबई : विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सुमारे ७० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. स्थानिक पातळीवर निष्ठावंतांना डावलून पक्षात नव्याने आलेल्यांना पदे दिल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकला. पालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना भाजपचे पदाधिकारी जाण्याने पक्षाला खिंडार पडले आहे.