ठाण्यातील ट्रॅफिकविरोधात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मैदानात!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

ठाणे शहरातील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेऊन, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या ट्रॅफिक तणावमुक्त ठाणे लोक अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेऊन, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या ट्रॅफिक तणावमुक्त ठाणे लोक अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

ही बातमी वाचली का? भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार

ठाण्यातील महत्त्वाच्या पंधरा ठिकाणी स्वाक्षरी अभियानात हजारो ठाणेकरांनी सहभाग घेतला अशी माहिती खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे व ठाणे शहराध्यक्ष, आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मेट्रो व कोपरी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत शहरातून जाणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, तसेच भाईंदर-भिवंडी ते उरण आणि उरण ते भिवंडी-भाईंदर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग विकसित करावेत ठाणेकरांना मुंबईत जाता-येता भरावा लागणारा टोल पूर्णपणे माफ करावा, आदी मागण्या भाजपच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

ही बातमी वाचली का? गरिबांचा पुरणपोळीचा घास हिरावला

िमस्ड काॅल देवून सहभागी व्हा!
अभियानात सहभागी होण्यासाठी ०८०४५९३६०७७ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊनही ठाणेकरांना जास्तीत जास्त सहभागी होता येईल, असे आवाहन खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे व आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP fight against traffic in Thane!