esakal | आलोंडे जिल्हा परीषद गटावर भाजपाचा झेंडा ; संदीप पावडे यांचा 802 मतांनी विजयी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

आलोंडे जिल्हा परीषद गटावर भाजपाचा झेंडा ; संदीप पावडे यांचा 802 मतांनी विजयी

sakal_logo
By
अमोल सांबरे

विक्रमगड : विक्रमगड (Vikramgad) तालुक्यातील आलोंडे जिल्हा परीषद गटासाठी 5 ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहिर झाला असुन. यात 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

आलोंडे गटात भाजपाचे उमेदवार संदीप पावडे यांनी 802 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या गटात राष्ट्रवादी व जिजाऊ संघटनेचे मोठे प्राबल्य असतांना राष्ट्रवादीचे उमेदवार विपुल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. असे असतांना शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुले शिवसेनेचे उमेदवार संजय आगिवले यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

या गटाच्या क्षेत्रात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे व जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे राहत असल्याने आलोंडे जिल्हा परीषद गटाच्या निकालाकडे सर्व पालघर जिल्हाचे लक्ष लागून राहिले असतांना या गटात राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला आहे.

Mumbai

Mumbai

हेही वाचा: पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा शिवसेनेकडे

आलोंडे जिल्हा परीषद गटातून शिवसेना संजय आगिवले -1865 मते मिळाली तर माकपा राजा गहला -1296, काँग्रेस देविदास पाटील -113, राष्ट्रवादी विपुल पाटील-3351, भाजपा संदिप पावडे- 4153, बविआ ऋषिकेश बोडके-717, अपक्ष मिठाराम भोईर-780 तर नोटा- 274 या गटातून 16,922 मतदानापैकी 12,549 मतदान झाले होते. 7 उमेदवारांपैकी भाजपचे उमेदवार संदिप पावडे 802 मतांनी विजय झाले आहेत.

loading image
go to top