

Dispute between Shinde Sena and BJP in Thane
ESakal
ठाणे : मागील काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये विविध कारणांवरून संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच आता बीएसयूपी घरांच्या नोंदणीसाठी फक्त १०० रुपयांत रजिस्ट्रेशनची दिलेली सवलत जाहीर झाल्यानंतर या दोघांत श्रेय घेण्यावरून वाद झाला असून, भाजपच्या माजी नगरसेवकाने शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याला कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे.