

BJP Vikas Mhatre Joins Shinde Shivsena
ESakal
डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सकाळी शिवसेना शिंदे गट मधील माजी नगरसेवकाला आपल्या पक्षात दाखल करून भाजपने शिंदे गटाला धक्का दिला होता. मात्र दिवस सरत असताना शिंदे गटानेही ठोस पलटवार करत भाजपचे माजी स्थायी समिती सभापती आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते विकास म्हात्रे हे आपल्या गटात प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले आहे. म्हात्रे हे ठाण्याच्या दिशेने रवाना झाले असून लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. या हालचालीने डोंबिवलीच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.