Thane: ठाण्यात राजकीय उलाढाल! विद्यमान सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; ठाकरे गट-मनसेला धक्का

Kalyan Politics : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील विद्यमान सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांमी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गट आणि मनसेला धक्का बसला आहे.
Kalyan Politics

Kalyan Politics

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील खोणी येथे रविवारी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेला मोठा धक्का बसला आहे. खोणी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचांसह विविध पक्ष आणि संघटनांमधील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने कल्याण ग्रामीणमधील राजकीय समीकरणांमध्ये नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com