esakal | नवी मुंबईत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजप 'असं' करतंय प्लॅनिंग
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजप 'असं' करतंय प्लॅनिंग

नवी मुंबईत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजप 'असं' करतंय प्लॅनिंग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई -  नवी मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपने प्रदेश कार्यकारिणीचे दोन दिवसाचे अधिवेशन नवी मुंबईत आयोजित केले आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस अधिवेशन होणार आहे. पहिल्या दिवशी राज्यातील भाजप आमदार, खासदार, महापौर, जिल्हाध्यक्ष आदींच्या बैठका होणार आहेत. तर दुस-या दिवशी बुथ प्रमुखापासून ते सरपंच, नगराध्यक्ष यांच्या बैठका होणार आहे. या दोन दिवसांत नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणनितीची चर्चा होणार आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून मुळचे शिवसेनेचे नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले गणेश नाईक यांची नवी मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करताना गणेश नाईक यांनी तब्बल पन्नास पेक्षा जास्त समर्थक भाजपात घेऊन गेलेत. भाजप गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत पुन्हा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी नवी मुंबई महापालिका लढणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खुद्द अजित पवार यांनी नवी मुंबई महानगर पालिका गणेश नाईक आणि अनुषंगाने भाजपकडून स्वतःकडे घेण्याचा चंग बांधलाय. 

या बातम्या वाचल्यात का ? 

१. चोरीऐवजी घरातील उंची दारू प्यायला आणि चोराला सोफ्यावर लागली झोप, मग...

२. अशोक चव्हाण म्हणतात बाळासाहेब थोरातांना हटवा, सोनिया गांधीकडे तक्रार?

३. इथे आहे, सूर्याजी मालुसरे यांचे समाधिस्थळ...पाहा कसे आहे....

४. महाविकास आघाडीची व्होट बॅंक शाबूत ठेवण्यासाठी भीमा कोरेगावचा तपास NIA कडे?

५. धक्कादायक ! मुलींना सांगितलं 'मासिक पाळी नाही' हे सिद्ध करण्यासाठी अंतर्वस्त्र काढा...

bjp to hold two days party meetings in navi mumbai before NMMC election