"चुकीची कामं झाली तर..."; भाजपचा संजय राऊतांना इशारा

Sanjay-Raut-Sad
Sanjay-Raut-Sad

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात अखेर बुधवारी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. राज्य सरकारने पोलीस दलात महत्त्वपूर्ण फेरबदल करत परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून दूर केलं. त्यांच्याजागी मूळचे चंद्रपूरचे असलेले हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं होतं. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलाला नवं नेतृत्व मिळाल्याबद्दल त्यांनी ट्वीट केलं होतं. तसंच, पोलीस दलाच्या महान परंपरेबद्दलही त्यांनी मत व्यक्त केलं होतं. या ट्वीटला भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं.

"मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल, या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा", असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं. या ट्वीटवर केशव उपाध्ये यांनी त्यांना आणि सरकारला इशारा दिला. "(महाराष्ट्र पोलीस दलाची) ही महान परंपरा राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. सर्व नियम पायदळी तुडवत १६ वर्षानंतर सचिन वाझेसारख्या अधिकाऱ्याला परत घेताना ही परंपरा धुळीस मिळेल, हे लक्षात आलं नाही का? चुकीची कामं झाली तर वावटळीचं वादळात रूपांतर जनताच करेल", असा इशारा उपाध्ये यांनी दिला.

महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दलात बदल

पोलीस रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार, संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी तर परमवीर सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणाले...

"मुंबई पोलिसांसाठी सध्या कठीण काळ सुरू आहे. या कठीण काळात राज्य सरकारने माझ्यावर एक जबाबदारी सोपवली आहे. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे, ती सुधारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या सुधारणेमध्ये मला कॉन्स्टेबल ते आयुक्तांपर्यंत साऱ्यांचं सहकार्य हवं आहे. त्याचसोबत सर्व जनतेनेही आम्हाला सहकार्य करावं, अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्र व मुंबई पोलिसांवर कोणतीही टीका होणार नाही, यासाठी साऱ्यांच्या सहकार्याने आम्हाला पोलीस दलांत आवश्यक त्या सुधारणा करायच्या आहेत", अशी भूमिका मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com