'मुंबईकरांच्या घरात पाणी आणि मलईच्या गोण्या...'

आशिष शेलारांचा जोरदार प्रहार
'मुंबईकरांच्या घरात पाणी आणि मलईच्या गोण्या...'

मुंबई: पहिल्याच पावसाने (mumbai rain) मुंबई महापालिकेच्या (bmc) दाव्यांची पोल-खोल केली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीला ब्रेक लागला आणि मुंबईकरांना तुंबलेल्या पाण्यातू वाट काढावी लागली. मुंबई महापालिकेकडून मान्सूनपूर्व कामे केल्याचे दावे करण्यात येत होते. हे दावे किती तकलादू आहेत, ते स्पष्ट झाले. याच मुद्यावरुन भाजपाचे वरिष्ठ नेते आणि वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी महापालिकेवर सडकून टीका केली आहे. (bjp leader & mla ashish shelar slam bmc over water logging in mumbai)

"पहिल्याच पावसात पुन्हा मुंबई तुंबली. मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला. १०४ वा १०७ टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरला. प्रशासनाने काम केले नाही. कंत्राटदाराने पळ काढला सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदाराच्या कृकृत्यावर पांघरुण घातले" असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

'मुंबईकरांच्या घरात पाणी आणि मलईच्या गोण्या...'
'भरून दाखवलं'... भाजप नेत्याचा शिवसेनेला सणसणीत टोला

"संपूर्ण मुंबईत दरवर्षी ७० ते १०० कोटी रुपये नालेसफाईसाठी खर्च होतात. म्हणजेच पाच वर्षात ५०० कोटी रुपये झाले. ते सोडून, छोटे नाले, पाणी तुंबू नये म्हणून अन्य काम होतात, यासाठी दरवर्षी १०० कोटी प्रमाणे पाचवर्षांसाठी अधिकचे ५०० कोटी म्हणजे पाचवर्षात १ हजार कोटीचा खर्च होतात" अशी टीका शेलारांनी केली.

'मुंबईकरांच्या घरात पाणी आणि मलईच्या गोण्या...'
जुलैपासून हिंदमाता परिसरात पाणी नाही साचणार कारण...

"मुंबईकरांच्या नशिबी तुंबलेलं पाणी घरात घुसण्याची वेळ आली. आजही स्ट्रॉम वॉटर ड्रेन्समध्ये आम्ही पाहतोय, डेब्रीजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात पावसाचे पाणी मात्र मुंबईकरांच्या घरात. मलईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात! हे विदारक चित्र आहे. ज्या भागात पाणी तुंबत नाही, तिथे पाणी तुंबलय. पुढच्या तीन महिन्यात पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था उभी करा" असे त्यांनी आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com