esakal | मुंबईत लसीला प्रचंड डिमांड, खासगी रुग्णालयांनी मागितले २० लाख डोस
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

मुंबईत लसीला प्रचंड डिमांड, २० लाख डोसची मागणी

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईतील खासगी रुग्णालयांनी (Private hospitals) महापालिकेकडे २० लाख लसींची मागणी नोंदवली आहे. महापालिका ही यादी राज्य सरकारकडे सोपवेल. राज्य सरकार मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य रुग्णालयांकडून लसींची किती मागणी (vaccine demand) होतेय, ती संख्या एकत्रित करुन पुढे केंद्राला कळवेल. पुढच्या येणाऱ्या महिन्यांमध्ये खासगी क्षेत्राकडून (private sector) लसींची किती मागणी होतेय, त्याचा अंदाज बांधण्यासाठी ही प्राथमिक स्वरुपाची यादी आहे. (Private hospitals in Mumbai seek 20 lakh doses)

येत्या २१ जूनपासून नव्या धोरणानुसार, लस खरेदीला सुरुवात होईल. केंद्र सरकार देशात बनवलेले लसीचे ७५ टक्के डोस खरेदी करेल. त्यानंतर केंद्राच्या देखरेखीखाली खासगी क्षेत्राला उर्वरित २५ टक्के स्टॉक विकत घेता येईल. ५ हजार ते १.७५ लाखाच्या रेंजमध्ये हॉस्पिटल्सनी कोरोना प्रतिबंधक लसींच्या डोसेसची मागणी केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: तेव्हाच मुंबईला आणणार लेव्हल २ मध्ये

काही रुग्णालयांनी एक लाखापर्यंत तर काही रुग्णालयांनी १० ते ३० हजारपर्यंत लस पुरवठ्याची मागणी केली आहे. वोकहार्ट, नानावटी, सुराना ग्रुप, वेलस्प्रिंग हेल्थकेयर, ऑस्कर हॉस्पिटल यांनी १ ते २ लाख लसींच्या डोसची मागणी केली आहे.

हेही वाचा: ९८ दिवसानंतर पहिल्यांदाच कल्याणमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

बॉम्ब हॉस्पिटल, सैफी, कोहीनूर, सुश्रूत, प्रिन्स अली खान, मसिना या रुग्णालयांनी १० ते ७५ हजारपर्यंत लसीच्या डोसची मागणी केली आहे. कोव्हिशिल्डच्या लसीला मोठी मागणी आहे. अंदाजित १६ ते १७ लाख डोस मागितले आहेत. ८८ खासगी नोंदणीकृत सेंटर्सपैकी ५० केंद्रांनी आपली मागणी नोंदवली आहे.

loading image
go to top