...म्हणून राज्यातील भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

धूलिवंदनाच्या दिवशी भाजपने मध्य प्रदेशमध्ये राजकीय रंगाची उधळण केल्याने कमलनाथ सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. मध्य प्रदेशात सुरू असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील मरगळलेल्या भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मुंबई : धूलिवंदनाच्या दिवशी भाजपने मध्य प्रदेशमध्ये राजकीय रंगाची उधळण केल्याने कमलनाथ सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. मध्य प्रदेशात सुरू असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील मरगळलेल्या भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महत्वाची बातमी ः जोतिरादित्य शिंदेंच्या राजीनामन्यानंतर मुंबईतील 'हा' मोठा नेता देणार काँग्रेसला सोडचिठ्ठी ?

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाआघाडी सरकारने नुकतेच १०० दिवस पूर्ण केले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या मूलभूत राजकीय आणि वैचारिक मतभेदांमुळे सरकार फार काळ टिकणार नाही. अंतर्गत मतभेदांमुळे राज्य सरकार कोसळेल, अशी आशा राज्यातील भाजप नेत्यांना होती. त्यामुळे भाजपने सीएए, एनआरसी, सावरकर, मुस्लिम आरक्षण आदी मुद्द्यांवर शिवसेनेची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला; मात्र शिवसेनेनेसुद्धा सीएए आणि मुस्लिम आरक्षणावर आपली रोखठोक भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अयोध्येला भेट दिली. तेव्हा आम्ही भाजपपासून दूर गेलो; हिंदुत्वापासून नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला प्रत्युतर दिले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडणार नसल्याची जाणीव भाजप नेत्यांना झाली.

महत्वाची बातमी ः मोठा खुलासा : उद्धव ठाकरेंबद्दल राजकीय हवा चटकन ओळखणारे रामदास आठवले म्हणतात...

मात्र, मध्य प्रदेशमध्ये सुरू झालेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला आहे. सत्ता गमावल्यानंतर भाजपमध्ये नाराज नेत्यांची संख्या वाढली होती; मात्र उशिरा का होईना नाराज नेत्यांची दिल्लीदरबारी दखल घेतली गेली. राज्यात भाजपमधील अंतर्गत नाराजी दूर होण्याची अपेक्षा भाजप 
नेतृत्वाला आहे.

शिवसेना नव्याने विचार करेल...
मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारे फोडाफोडीचे राजकारण झाले, तसे राजकारण महाराष्ट्रात करणे शक्‍य नाही, याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता समीकरण बदलायचे असल्यास शिवसेनेला नव्याने साद घालावी लागणार आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आजपर्यंत शिवसेनेला शिंगावर घेण्याची किंवा तीव्र शब्दांत टीका करण्याचे टाळले जात आहे. मध्य प्रदेशातील राजकीय घडामोंडीमुळे शिवसेनेवर मानसिक दबाव येऊ शकतो, त्यामुळे शिवसेना नव्याने विचार करेल, अशी अपेक्षा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.

महत्वाची बातमी ः "एकही महत्त्वाचं खातं नसलेले पाहिले मुख्यमंत्री सध्या शॅडो म्हणूनच काम करतायत"

एकजुटीने कामाला लागतील
काही दिवसांपूर्वी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते. काही नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे संकेतही पक्षश्रेष्ठींनी दिले आहे. त्यामुळे राज्यात भाजपमधील अंतर्गत नाराजी दूर होऊन सर्व जण एकजुटीने कामाला लागतील, अशी अपेक्षा भाजप नेतृत्वाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp maharashtra leaders hopes to come in rule