सर्व धार्मिक स्थळे तातडीने खुली करण्याच्या मागणीसाठी कुणी ठोठावलीत राज भवनाची दारं?

सर्व धार्मिक स्थळे तातडीने खुली करण्याच्या मागणीसाठी कुणी ठोठावलीत राज भवनाची दारं?

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील सर्व धार्मिक स्थळे तातडीने उघडण्याची मागणी केली. बुधवारी म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजन प्रसंगी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली असावीत असा आग्रह या शिष्टमंडळाने धरला आहे. लोढा यांच्या सोबत भाजपचे मुंबईतील आमदार होते.

यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना होत असलेल्या प्रशासनिक जाचाबद्दलही राज्यपालांकडे तक्रार केली. ई-पास  बाबत असलेले घोळ, गावी क्वारंटाईन होण्याची सक्ती, कोकणातील वैद्यकीय सुविधांची दुरवस्था, प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीची अनुपलब्धता अशा अनेक बाबतीत राज्यपालांना अवगत केले. 

तसेच भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारकडून बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दलही तक्रार केली. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने कुणालाही न वाचवता या प्रकरणातील मुख्य गुन्हेगारांना पकडण्यास मदत केली पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे.

( संकलन - सुमित बागुल )

BJP maharashtra leaders met governor bhagatsingh koshyari and asked to open temples

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com