esakal | एकनाथ खडसेंना भाजपकडून 'हे' मोठं गिफ्ट मिळणार ? ...

बोलून बातमी शोधा

एकनाथ खडसेंना भाजपकडून 'हे' मोठं गिफ्ट मिळणार ? ...
एकनाथ खडसेंना भाजपकडून 'हे' मोठं गिफ्ट मिळणार ? ...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांना लवकरच भाजप मोठं गिफ्ट देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ खडसे यांना भाजप थेट राज्यसभेवर पाठवणार आहे अशी शक्यता वर्तवली जातेय. 

येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या काही खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. भाजपकडून खासदार म्हणून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. यात रामदास आठवले, संजय काकडे आणि उदयनराजे भोसलेही आहेत. मात्र राज्यातल्या भाजप नेत्यांकडून एकनाथ खडसेंचं नाव यासाठी समोर केलं जातंय अशी माहिती मिळतेय.

हेही वाचा: #Coronavirus: घरच्या घरी 'असं' बनवा हँड सॅनेटाईझर..

 २०१४ विधानसभा निवडणुकांच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ खडसे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र निकालानंतर केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळाली. त्यानंतर खडसेंना भूखंड घोटाळ्यात आपलं मंत्रिपदही गमवावं लागलं होतं. त्यामुळे एकनाथ खडसे भाजपच्या काही नेत्यांवर नाराज होते. काही दिवसांआधी एका कार्यक्रमात भाषण करताना खडसेंनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. त्यातून त्यांचा राग स्पष्ट दिसून आला होता. मात्र आता त्यांना थेट राज्यसभेवर पाठवून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय अशा चर्चा आहेत.

भाजपकडून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांची नावं आधीच निश्चित करण्यात आली आहेत. मात्र तिसऱ्या नावासाठी संजय काकडे की एकनाथ खडसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी राज्यातले भाजप नेते आग्रही आहेत. मात्र यातून खडसेंना राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न भाजप नेते करत आहेत अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होतेय. 

हेही वाचा: महावितरणाच्या इतिहासातील सर्वात दुर्मिळ चोरी.. वाचाल तर... 

त्यामुळे आता एकनाथ खडसेंना राज्यसभेची ऑफर मिळणार का ? आणि मिळाली तर खडसे ही ऑफर स्वीकारणार का ? हेच बघणं महत्वाचं असणार आहे.  

BJP may send Eknath Khadse to Rajyasabha read full story