

BJP exposing Uddhav Thackeray Corruption
ESakal
मुंबई : महापालिकेत २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईकरांच्या कष्टाच्या तीन लाख ५० हजार कोटी रुपयांवर डल्ला मारून महाघाेटाळा केल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केला आहे. ठाकरे गटाने जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या काही तासांतच भाजपने त्यांच्याविरोधात ‘आरोपपत्र’ प्रसिद्ध करून भ्रष्टाचाराचा पाढा वाचला आहे.